Header Ads

श्री महालक्ष्मी माहात्म व्रत,मार्गशीष महिन्यातील गुरुवारची संपूर्ण व्रत कथा, Margashisha Gruruvar Vrat Katha,

Gruruvar Vrat Katha,

Anythings4you2


श्री महालक्ष्मी माहात्म व्रत,मार्गशीष महिन्यातील गुरुवारची संपूर्ण व्रत कथा

Margashisha Gruruvar Vrat Katha,



श्री लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, तिची कृपा आपल्या सर्व पिढ्यांवर कायम राहावी,सुख, शांती , समाधान , धन आणि धान्य यांचा सतत वर्षाव व्हावा म्हणून श्री महालक्ष्मी मातेचे व्रत हे श्रध्देने आणि आनंदाने करावे. हे केल्याने आपल्या सर्व ईच्छा पूर्ती होतात. मार्गशीर्ष मास ला धार्मिक दृष्ट्या मराठी संस्कृतीत खास महत्त्व आहे. या मासात सवाष्ण स्त्रिया श्री महालक्ष्मी मातेचे व्रत (Shri Mahalaxmi Vrat) करतात,कार्तिक महिना समाप्ती नंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना हाच या व्रत साठी खास असतो आहे. या महिन्यामध्ये दर गुरूवारी श्री महालक्ष्मी मातेचं  व्रत करून तसेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या गुरुवारच्या निमित्ताने व्रत करणाऱ्या स्त्रिया श्री महालक्षमी मातेचे व्रत कथेचे पठण करतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार चे व्रत ही कथा नेमकी काय आहे? आणि श्री महालक्ष्मी मातेचे व्रत का करावे याविषयी आम्ही आपणास काही माहिती देणार आहोत. त्याकरिता चला जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार व्रतामागील संपूर्ण कथा.



Margashisha Gruruvar
 


स्वस्तिक,गोपद्म,कमळ,शंख ,चक्र ,पूर्ण चन्द्राचे कला (पौर्णिमा) , लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्री लक्ष्मी मातेचे आठ अवताराला 'श्रीअष्टलक्ष्मी' असे म्हणतात. महालक्ष्मीचे आठ रूप आहेत आणि ती रूपे पुढील नावाने प्रसिद्ध आहेत.

"आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी"


श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. माधवी, रमा, कमला, श्री, पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. श्रीसूक्तात  पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,विष्णुप्रिया,कमला,प्रकृति ,धरणी पृथ्वी ,पद्मा,माधवी ,सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतस्र्रजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया श्री लक्ष्मी मातेला या नावाने सुध्दा संबोधिले जाते. अशा या तिन्ही लोकी असलेल्या श्री महालक्ष्मी मातेचे सदा सर्वदा प्रत्येकाच्या मनामध्ये स्मरण असावे अशी ही कहाणी आहे द्वापार-युगातली.

Margashisha Gruruvar
 
Margashisha Gruruvar

        म्हातारीने त्या दासीला श्री लक्ष्मीव्रताची माहिती सविस्तर सांगितली. मग ती उठली व काठी टेकत टेकत जाणार, तेवढ्यात राणी झटपट महालातून बाहेर आली. जीर्ण वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती रागावली आणि उध्दट, उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू म्हातारे ? इथे का आणि कशाला आलीस ? इथून निघून जा." तिने पुढे होऊन म्हातारीला तिथून घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती, हे राणीला कळलेच नाही. राणीचा तो उर्मटपणा, उध्दटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तेव्हाच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि दुःखाने कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नकोस . माझी आई चुकली आहे. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते प्रांजळ, निर्मळ बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला श्री लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.


Margashisha Gruruvar

          पुढे त्या दासीने श्री लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती दिवसेंदिवस सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मीव्रत केले. सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते मनापासून व्रत केले. शेवटच्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले.


Margashisha Gruruvar
  

          लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा होऊ लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; तीची ती  स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.


Margashisha Gruruvar

 
           एक दिवस भद्रश्रवाला ईच्छा झाली, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठावर बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत धावत महालात गेली. राजाला सविस्तर बातमी सांगितली. शामबालालाही ते कळाले. शामबाला आणि मालाधरा यांनी रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जाण्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.
Margashisha Gruruvar
 

भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढून पाहिले. आत पाहते तर काय ? हंड्यात धन इत्यादी काहीच नव्हतेच. होते ते फक्त कोळसे ! श्री महालक्ष्मीच्या अवकृपे मुळे हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला आणि दुःखी झाली. भद्र्श्रवा हि घटना पाहून चकित झाला होता.
            दुःखाचे दिवस जात नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव नकोसा होत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही मुलीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका मुलीच्या घरी पोहोचली. तेव्हा तिची मुलगी शामबाला व्रताचे उद्यापन करत होती. शामबालाने आईकडूनही श्री महालक्ष्मी-व्रत करून घेतले. चार दिवस मुलीकडे आनंदाने राहून सुरतचंद्रिका परत आपल्या घरी आली. श्री लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'वडील' भेटायला गेले असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही,' हा राग राणीच्या मनात अजूनही होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच, अवहेलनाच केली. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ ( या सृष्टी चे सार ) भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.

Margashisha Gruruvar
 
स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेरा कडून काय आणले आहे ?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने हंडा उघडून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' ( आता कळला या सृष्टी चे सार याचा अर्थ ) शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पूर्णपणे पटले

थोडक्यात, जे कुणी श्री महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे पूजन करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपादृष्टि होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची मनोकामना पूर्ण करेल.

श्री महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥



श्रीलक्ष्मी नारायण संस्कृत श्लोक


ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

ॐ महालक्ष्मी नमः, ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः

1 comment:

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.