Header Ads

वरुथिनी एकादशी व्रत कथा : Varuthini Ekadashi (कन्यादानाचे फळ)

 
Ekadashi

Anythings4you2

!! वरुथिनी एकादशी व्रत कथा !!

    अर्जुन म्हणाला - हे प्रभू ! वैशाख महिन्यात, कृष्ण पक्षातील एकादशी चे नाव काय आहे ? त्याचे विधान काय आहे ? आणि त्यामुळे कोणती फळ प्राप्ती होते ? हे कृपा करून सविस्तर सांगण्याची कृपा करावी. 

    अर्जुनाचे हे म्हणणे ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले -हे अर्जुन ! वैशाख महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशीला "वरुथिनी एकादशी" म्हणतात. हि एकादशी सौभाग्य प्रदान करणारी आहे. या एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापें नष्ट होतात. जर या एकादशीचा उपवास दुःखी सौभाग्यवती स्त्री करते तर तिला सौभाग्य प्राप्ती होते. वरुथिनी एकादशी च्या प्रभावाने राजा मान्धाताला स्वर्ग प्राप्ती झाली. त्याच प्रमाणे धुन्धुमार इत्यादींना सुध्दा स्वर्ग प्राप्ती झाली. दहा हजार वर्षे तप केल्याने जे फळ प्राप्त होते त्या सामान वरुथिनी एकादशीचा उपवास केल्याने फळ मिळते. 

    कुरुक्षेत्र या ठिकाणी सूर्यग्रहण समयी एकदा स्वर्ण दान केल्याने जे फळ प्राप्त होते त्यासमान वरुथिनी एकादशीचा उपवास केल्याने फळ प्राप्त होते. हे व्रत केल्याने प्राणी इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे सुखी राहतो आणि अंततः स्वर्ग प्राप्त होतो. 

    हे राजन ! या एकादशीच्या उपवासामुळे मनुष्यास इहलोकी सुख आणि परलोकी मुक्ती प्राप्त होते. शास्त्रात असे सांगितले आहे कि घोडयाचे दान या पेक्षा हत्तीचे दान श्रेष्ठ आहे, हत्तीचे दाना या पेक्षा भूमीचे दान श्रेष्ठ आहे, त्यापेक्षाही तिळाचे दान श्रेष्ठ आहे, तीळचे दान पेक्षा श्रेष्ठ स्वर्ण दान आणि स्वर्ण दान या पेक्षा श्रेष्ठ अन्न दान. संपूर्ण ब्रह्मांडात अन्नदान या पेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही. अन्नदान केल्याने पितृ, देवता, मनुष्य आदी सर्व तृप्त होतात. कन्यादान शास्त्रात अन्न-दान समान आहे. 

    वरुथिनी एकादशीचा उपवास केल्याने अन्नदान तथा कन्यादान दोन्ही श्रेष्ठ दान केल्याचे फळ प्राप्त होते. जो मनुष्य लालचेपोटी कन्याचे धन घेतो, आळस आणि कामचोर या मुळे जो कन्याचे धन भक्षण करतो तो प्रलय च्या शेवट पर्यंत नर्कात राहतो किंवा त्याला मांजरीच्या जन्माला यावे लागते. 

    जी व्यक्ती प्रेमभावनेने तसेच यज्ञ संस्कार करून कन्यादान करते तिचे पुण्य लिहिण्यास चित्रगुप्त सुध्दा असमर्थ असतात. जो प्राणी वरुथिनी एकादशीचा उपवास करतो त्यांना कन्यादानाचे फळ प्राप्त होते. 

वरुथिनी एकादशीचे उपवास करणाऱ्यांनी दशमीच्या दिवसापासून निम्मंलिखित वस्तूंचा त्याग करायचा आहे.

  • काशाच्या भांडयात जेवण करणे.
  • मांस
  • म्हसूरची डाळ
  • चना
  • बाजरी
  • शाक
  • मध
  • दुसऱ्याचे अन्न ( उष्ट )
  • दोन वेळा जेवण

    हे व्रत पूर्णपणे ब्रम्हचर्याचे पालन करून करावे. रात्र समयी नीद्रा घेऊ नये. संपूर्ण रात्र चिंतन, मनन तसेच भजन किर्तन इत्यादी करावे. दुसऱ्याची निंदा तथा नीच पापी लोकांची संगत सुध्दा करू नये. राग करणे किंवा खोटे बोलणे वार्जित आहे. तेल तथा अन्न सेवन करण्यास मनाई आहे. 

    हे राजन ! जो मनुष्य या एकादशीचे व्रत भक्तिभावाने, विधानपूर्वक आणि श्रध्देने करतो आहे, त्याला स्वर्ग प्राप्ती होते. अंततः मनुष्याला कुकर्मांपासून दूर राहिले पाहिजे. या एकादशीचे माहात्म्य जो पठण करेल त्याला एक सहस्त्र गौदानाचे पुण्य प्राप्त होईल. याचे फळ गंगा स्नानापेक्षा अधिक आहे. 

!! कथा-सार !!

    सौभाग्य चा आधार संयम आहे. सर्व प्रकारचा संयम केल्याने मनुष्याच्या सुख आणि सौभाग्यात वृध्दि होते. जर प्राणिमात्रामध्ये संयम नाही आहे तर त्यांच्याद्वारे केले गेलेल्या तप, त्याग, भक्ती,पूजा इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. 

!! ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !! 

No comments

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.