Header Ads

पापमोचनी एकादशी व्रत कथा : एक सहस्र गो दानाचे पुण्य १८/०३/२०२३ ; Papmochani Ekadashi

Papmochini Ekadashi

Anythings4you2

 पापमोचनी एकादशी व्रत कथा

Papmochani Ekadashi 

अर्जुन म्हणाला

    हे मधुसूदन ! मी जसे जसे एकादशीच्या व्रत कथा श्रवण करीत आहे तसे तसे समस्त (अन्य) एकादशीच्या व्रत कथा श्रवण करण्याची उत्सुकता वाढत आहे. हे माधव ! आता कृपा करून आपण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी बद्दल मला माहिती सांगण्याची कृपा करावी. या एकादशीचे नाव काय आहे ? या एकादशीला कोणत्या देवाचे पूजन केले जाते ? तसेच याचे व्रत पारायण कसे करावे ? हे नंदमुरारी ! या सर्व गोष्टी आपण मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी .


भगवान श्रीकृष्ण म्हणाले -

    हे अर्जुन ! एके काळी हाच प्रश्न पृथ्वीपती मान्धाता यांनी लोमश ऋषी यांना केला होता. जे लोमश ऋषी यांनी मान्धाता यांना सांगितले होते तीच माहिती मी तुला सांगत आहे. राजा मान्धाता यांनी धर्माच्या गृह्यतम रहस्याचे ज्ञाता महर्षी लोमश यांना विचारले- हे ऋषीश्रेष्ठ ! मनुष्याने केलेल्या पापांपासून कोणत्या प्रकारे मुक्ती संभव आहे ? कृपा करून असा काही मार्ग सांगा ज्या योगे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल.  

महर्षि लोमश म्हणाले

    'हे नृपती! चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला पापमोचीनी एकादशी म्हणतात. त्याच्या व्रत, पारायण आणि उपवासाच्या परिणामामुळे मानवांचे अनेक पाप नष्ट होतात. या व्रताची कथा मी तुम्हाला सांगतो, काळजीपूर्वक श्रवण करावि - प्राचीन काळी चैतरथ नावाचे वन होते. त्या वनात अप्सरा किन्नरांसोबत विहार करीत होत्या. तिथे सदैव वसंत ऋतू असायचा, त्या ठिकाणी नेहमीच अनेक प्रकारची सुंदर (पुष्प) फुले उमलतात असायची. कधी कधी गंधर्व कन्या विहार करायच्या, तर कधी देवेंद्र (इंद्र देव) इतर देवतांसोबत क्रीडा करीत असत. 

    त्याच वनात मेधवी नावाचे ऋषीसुद्धा तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते. एके दिवशी मज्जूघोषा नावाच्या अप्सराने त्यांना भुरळ घातली आणि त्यांच्या सान्निध्यातून लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्याकरिता ती काही अंतरावर बसून वीणा वाजवत आणि मधुर आवाजात गायन करू लागली. त्याचवेळी शिवभक्त महर्षि मेधवी यांच्या वर कामदेव यांनी सुध्दा आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही सुरू केला. कामदेवने त्या सुंदर अप्सराच्या भृ चा धनुष्य बनविला. त्याने तिच्या नजरेची प्रत्यंचा आणि तिच्या नयनांना मज्जूघोषा अप्सराचा सेनापती केले. अशाप्रकारे, कामदेव आपल्या शिवभक्ता वर प्रभाव मिळविण्यास तयार झाले. त्यावेळी महर्षी खूप तरूण आणि अतिशय सामर्थ्यवान होते. त्यांनी यज्ञोपवीत आणि दंड धारण केलेले होते. ते दुसर्या कामदेवा प्रमाणे दिसत होते. त्या ऋषींना पाहून कामदेवच्या प्रभावाखाली असलेल्या मज्जूघोषा ने हळू हळू वीणावर मधुर आवाजाने गायला सुरुवात केली. मग महर्षि मेधवी देखील मज्जूघोषाच्या मधुर गाण्यांनी आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले. ती अप्सरा मेधावी ऋषींना कामदेवांच्या प्रभावाखाली समजून त्यांना आलिंगन देऊ लागली. 

    महर्षी मेधावी तिच्या सौन्दर्यावर मोहित होऊन शिव महात्म्य विसरून गेले आणि काम वासनेच्या आहारी जाऊन तिच्या सोबत सहवास करू लागले. 

    कामवासनेचा आहारी असल्यामुळे म्हणजेच कामदेवयांच्या प्रभावामुळे ऋषींना दिवस किंवा रात्र याचे भानच राहिले नाही आणि त्यांनी एकत्र खूप समय व्यतीत केला. त्यानंतर मज्जूघोषा त्या ऋषींना म्हणाली - हे ऋषीवर ! आता मला खूप वेळ झाला आहे. तरी कृपया मला स्वर्गात परत जाण्याची आज्ञा द्यावी. 

    अप्सरांचे हे बोलणे ऐकल्यावर ऋषी म्हणाले -हे मोहिनी ! संध्याकाळ असताना तू आली आहेस प्रातःकाळ झाल्यावर तू जा. 

    ऋषींचे हे वचन ऐकल्यावर अप्सरा त्यांच्या सोबत तिचेच त्यांच्या सहवासात थांबली. अश्याप्रकारे त्या दोघांनी एकमेकांसोबत खूप काळ व्यतीत केला. 


    पुन्हा एकदा मज्जूघोषा ने एक दिवस ऋषींना म्हणाली -हे विप्र ! आता मला तुम्ही स्वर्गात जाण्याची आज्ञा द्यावी. 


    ऋषी मुनी पुन्हा तेच बोलले - हे रुपसी ! अजून खूप वेळ झाली नाही आहे. काही काळ अजून थांब. 

    ऋषींचे हे वाचन ऐकल्यावर अप्सरा म्हणाली - हे ऋषीवर आपली रात्र खूप मोठी आहे. आपण स्वतः विचार करावा कि मला आपल्या जवळ येऊन किती काळ झाला आहे आणि आता अजून अधिक काळ थांबणे काय उचित आहे का ? 


    अप्सराचे हे वचन ऐकल्यावर ऋषींना वेळेचे भान जाणवले आणि ते गंभीरपणे विचार करू लागले. जेव्हा त्यांना वेळेचे हे सत्य समजले कि त्यांनी त्या अप्सरेबरोबर सत्तावन्न (५७) वर्ष व्यतीत केले आहेत. त्या क्षणी ते त्या अप्सरेला काळाचे रूप समजू लागले. इतका जास्त वेळ भोगविलासमध्ये व्यर्थ गेल्यामुळे त्यांना राग आला. आता ते भयंकर क्रोधाअग्नि मध्ये जळत होते. तसेच रागाने त्या अप्सराकडे पाहत होते. राग अनावर झाल्यामुळे त्यांच्या शरीराचा कंप होत होता तसेच सर्व इंद्रियांचा ताबा सुटत होता. त्याच रागात रागीट स्वरात ऋषींनी अप्सरेला म्हटले - माझे तप नष्ट करणारी दृष्टा ! तू महा पापी आणि दुराचारिणी आहेस. तुझा धिक्कार असो. आता माझा श्राप आहे कि तू पिशाचीनी होशील. 


    ऋषींच्या क्रोधयुक्त श्रापामुळें ती अप्सरा पिशाचीनी झाली. हे झाल्यावर ती दुःखी झाली आणि म्हणाली - हे ऋषीवर ! आता क्रोध करू नका, त्याचा त्याग करावा आणि माझ्यावर प्रसन्न व्हावे. कृपा करून या श्रापातून मुक्ती कशी मिळेल हे सांगावे. विद्वानांनी सांगितले आहे ऋषीमुनींच्या सहवासात चांगले फळ मिळते आणि आपल्या सोबत तर माझे खूप वर्ष व्यतीत झाले आहेत. तरी माझ्यावर आपण प्रसन्न व्हावे अन्यथा समाज म्हणेल कि एक पुण्य आत्म्या सोबत राहून सुध्दा मज्जूघोषा पिशाचीनी झाली. मज्जूघोषाचे हे वचन ऐकल्यावर ऋषींना आपल्या रागावर अत्यंत लज्जा निर्माण झाली तसेच आपल्या अपकीर्तीची भीती सुध्दा उत्पन्न झाली. शेवटी पिशाचीनी झालेल्या मज्जूघोषाला ऋषी म्हणाले - तू माझे खुप अहित केले आहे तरी सुध्दा मी तुला या श्रापातून मुक्ती मिळविण्याचा उपाय सांगत आहे. चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील जी एकादशी आहे तिचे नाव पापमोचिनी एकादशी आहे. त्या एकादशीचे व्रत, उपवास किंवा कथा ग्रहण केल्याने तुला पिशाचीनी योनीतुन मुक्ती मिळेल. 


    हे सर्व सांगितल्यानंतर ऋषींनी तिला व्रतासंबंधित सर्व यम -नियम समजावून सांगितले. तदनंतर ते आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याकरिता आपल्या वडिल च्यवन ऋषी यांच्याकडे गेले 

    च्यवन ऋषींनी आपल्या पुत्राकडे पाहून म्हणाले - हे पुत्र ! असे काय झाले कि तुझे सर्व तप नष्ट झाले. ज्यामुळे तू पूर्णपणे निस्तेज झालास. 

    मेधावी ऋषींनी लाजेने आपले मस्तक खाली करत सांगितले - पिताश्री ! मी एका अप्सरेबरोबर सहवास करून खूप मोठे पाप केले आहे. या पापामुळे माझे सर्व तप नष्ट झाले आहे. कृपा करून या पापातून मला मुक्ती मिळेल असा काही उपाय सांगावा. 

    ऋषींनी सांगितले - हे पुत्र ! तू चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील पापमोचिनी एकादशी चे व्रत, उपवास हे विधिपूर्वक तसेच भक्तिभावाने कर. तुझ्या सर्व पापांचा नाश होईल. 

    आपल्या वडिलांचे म्हणजेच च्यवन ऋषींचे हे वचन ऐकल्यावर मेधावी ऋषींनी पापमोचिनी एकादशी चे विधिपूर्वक तसेच भक्तिपूर्वक व्रत, उपवास केला. त्या प्रभावामुळे त्यांचे सर्व पापें नष्ट झालीत. मज्जूघोषा अप्सरासुध्दा पापमोचिनी एकादशीचे व्रत, उपवास केल्यामुळे पिशाचीनी योनीतुन मुक्त होऊन पूर्वीप्रमाणे सुंदर रूप प्राप्त झाले. तसेच ती स्वर्गात गेली. लोमश ऋषी म्हणाले - हे राजन ! या पापमोचिनी एकादशीच्या प्रभावामुळे समस्त पापांचा नाश होतो. या एकादशीच्या कथा पठणाने किंवा श्रवणाने एक हजार गो दानाचे फळ प्राप्त होते. या उपवासामुळे ब्रम्ह हत्या, स्वर्ण चोरी, मद्यपान आणि अगम्या गमन करणे या सारखे आदी इत्यादी भयंकर पापें नष्ट होतात आणि अंततः स्वर्गलोक प्राप्ती होते. 

!! कथा-सार !! 

    हि कथा हे स्पष्ट करते कि शारीरिक आकर्षण हे जास्त काळ नाही टिकत. शारीरिक सौदर्यच्या मोहात मेधावी ऋषी आपले तप संकल्प विसरून गेले. हे भयंकर पाप मानले जाते. परंतु भगवान श्रीहरी यांची पापमोचिनी शक्ती या भयंकर पाप कर्मातून सहज मुक्ती देण्यात समर्थ आहे. जो मनुष्य सदकर्मचे संकल्प केल्यानंतर लोभी-लालची आणि भोग-विलास या मध्ये वशीभूत होऊन आपले संकल्प विसरून जातो तो घोर नरकाचा भागी बनतो.



!! ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !!

No comments

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.