Header Ads

Yogini Ekadashi : Yogini Ekadashi Vrat Katha - 14/06/2023 ( योगिनी एकादशी व्रत कथा )

Ekadashi

Anythings4you2


 Yogini Ekadashi Vrat Katha - 2023

योगिनी एकादशी व्रत कथा

 

    अर्जुन म्हणाले -हे त्रिलोकीनाथ ! मी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची निर्जला एकादशी ची कथा ऐकली. आता आपण कृपा करून आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षातील एकादशी ची कथा मला सांगावी. या एकादशी चे नाव तसेच त्याचे माहात्म काय आहे ? हे सर्व काही मला तपशीलवार सांगावे हि विनंती आहे. 

    अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले- हे पांडू पुत्र अर्जुन ! आषाढ महिन्यातील, कृष्ण पक्षातील एकादशी चे नाव योगिनी एकादशी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत या लोकात सुख आणि परलोकात मुक्ती देणारे आहे. हे अर्जुन ! हि एकादशी तिन्ही लोकांत प्रसिद्ध आहे. या व्रतामुळे सर्व पापकर्मांचा लय होतो. तुला मी पुराणांतील काही कथा सांगतो. त्या तू लक्ष देऊन श्रवण कर. - अलंकापुरी नावाच्या नगरीत कुबेर नावाचा राजा राज्य करीत असे. तो महान शिव-भक्त होता. त्याचा हेममाली नावाचा यक्ष सेवक म्हणून कार्यरत होता. जो फक्त पूजे साठी लागणारे पुष्प ( फुले ) साहित्य आणत असे. हेममालीच्या कुटुंबात फक्त दोघेच होते. तो आणि त्याची पत्नी. हेममालीची पत्नी विशालाक्षी अति सुंदर होती. एक दिवस हेममाली मानससरोवरातून पूजेसाठी लागणारे पुष्प घेऊन आला पण आपल्या पत्नीला पाहून कामविवश झाल्यामुळे फुलांना तिचेच ठेऊन तो विशालाक्षी सोबत रममाण झाला. या एकमेकांच्या सहवासात दुपारची वेळ झाली. 

    राजा कुबेराला हेममालीची वाट पाहून जेव्हा दुपार झाली तेव्हा त्याने रागाने आपल्या अन्य सेवकांना आदेश दिला कि हेममाली अजून पुष्प का घेऊन आला नाही याचा शोध घ्यावा. आदेश मिळाल्यावर सेवक हेममालीच्या शोधात निघाले. ते शोध घेत हेममालीच्या घरी गेले. त्यांनी जो प्रकर पहिला, हेममालीला काही न सांगता ते परत राज्याकडे निघून आले आणि राजाला सांगितले - हे राजन ! हेममाली आपल्या पत्नीबरोबर रममाण झालेला आहे. 

    हे ऐकल्यावर राजा कुबेराने हेममालीला बोलाविण्याचा आदेश दिला. हेममाली घाबरत घाबरत राजा कुबेर समोर उपस्थित झाला. त्याला पाहता क्षणी राजाला अत्यंत क्रोध आला आणि त्याच्या होठांचा थरकांप होऊ लागला. 

    राजा कुबेर म्हणाला - अरे अधर्मी ! तू माझे परम पूज्यनीय, देवांचे देव भगवान महादेव यांचा अपमान केला आहेस. मी तुला श्राप देतो कि तू तुझ्या पत्नीच्या वियोगात कष्ट भोगशील तसेच मृत्युलोकात जाऊन पूर्ण जीवन कोड रुग्ण होऊन व्यतीत करशील. 

    राज कुबेराच्या श्रापामुळे तो तत्काळ स्वर्गातून पृथ्वीवर आला आणि कोड रुग्ण झाला. त्याची पत्नी सुध्दा त्याच्यापासून दूर झाली. मृत्युलोकात आल्यावर त्याने भयंकर कष्ट भोगले. परंतु भगवान महादेवांच्या कृपेमुळे त्याची बुध्दी भ्रष्ट झाली नाही त्यामुळे त्याला पूर्वजन्मीचे सर्वकाही आठवत होते. अनेक कष्ट भोगत आपल्या पूवजन्मीचे कुकर्म आठवत तो हिमालय पर्वताच्या दिशेने जाऊ लागला. 
    असेच चालत चालत असता तो मार्कण्डेय ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहचला. ते ऋषी अत्यंत वृध्द तपस्वी होते. साक्षात ते दुसरे ब्रम्हदेवाप्रमाणे प्रतीत होत होते आणि त्यांचा आश्रमसुद्धा ब्रह्मसभे प्रमाणे दिसत होता. ऋषींना पाहताच हेममाली त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना दंडवत प्रणाम करून त्यांच्या चरणावर डोके ठेवले. 

    हेममालीला पाहून मार्कण्डेय ऋषी म्हणाले - तू असे कोणते निकृष्ट कर्म केले आहेस जेणेकरून तू कोड रुग्ण झालास आणि हे भयानक कष्ट भोगत आहेस ? 

    महर्षींचे हे वचन ऐकून हेममाली म्हणाला - हे मुनिश्रेष्ठ ! मी राजा कुबेर यांचा सेवक होतो. माझे नाव हेममाली आहे. मी दररोज मानससरोवरात जाऊन फुल घेऊन येत असे आणि ते फुल राजा कुबेर यांना शिव पूजेच्या वेळी देत असे. एक दिवस मी माझ्या पत्नी सोबत रममाण असतांना वेळेचे भानच राहिले नाही. आणि दुपारपर्यंत मी पूजेकरिता पुष्प देऊ शकलो नाही. त्यामुळे राजा कुबेरयांनी मला श्राप दिला कि पत्नी वियोग आणि पृथ्वीवर जाऊन कोड रुग्ण अश्या यातना भोगाव्या लागतील. त्यामुळे मी कोड रुग्ण झालो आहे. तसेच पृथ्वीवर भयंकर कष्ट भोगत आहे. अंततः कृपा करून आपण असा कोणता उपाय सांगावा जेणे करून मला यातून मुक्ती मिळेल. 

    मार्कण्डेय ऋषी म्हणाले - हे हेममाली ! तू माझ्या समोर मला सत्य सांगितले आहेस. त्यामुळे मी तुला तुझा उध्दार होण्याकरिता एक व्रत सांगत आहे. जर तू आषाढ महिन्यात कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक आणि नियमपूर्वक केले तर तुझे सर्व पापें नष्ट होतील. 

    महर्षीचे हे वचन ऐकून हेममाली अति प्रसन्न झाला आणि त्याने त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशी चे व्रत नियमपूर्वक पूर्ण केले. या व्रताच्या प्रभावामुळे तो पुन्हा आपल्या पूर्वस्वरूपात आला आणि आपल्या पत्नीसमवेत संसार करू लागला. 

    हे राजन ! या योगिनी एकादशीच्या कथेचे फळ आठ्याऐंशी सहस्त्र ब्राम्हणांना अन्न- दान केल्या प्रमाणे आहे. हे व्रत केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि अंततः मोक्ष प्राप्त होऊन त्याला स्वर्ग प्राप्ती होते.

 

!! कथा – सार !! 

    मनुष्याने पूजा-कर्म, धर्मादी कर्म मध्ये आळस, काम या वृत्ती करू नये. तसे न करता आपल्या मनाला सदैव परमेश्वराच्या सेवेत तत्पर ठेवावे.


एकादशी व्रत किंवा उपवासाबद्दल समज आणि गैरसमज


  • शक्यतो काही नवीन पिढीच्या भाविकांचे खूप काही प्रश्न असतात. जसे What is the benefit of Ekadashi? म्हणजेच एकादशीचा काय फायदा ?
पार्श्व एकादशीला व्रत करून आणि भगवान विष्णूची प्रार्थना केल्याने सर्व पापांचे भक्त शुद्ध होतात आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करतात. जर त्यांना या दिवशी उपवास करायचे असेल तर त्यांनी दशमीच्या सूर्यास्तानंतर अन्नाचे सेवन करु नये. त्यांना तीळ, मौसमी फळे आणि तुळशीच्या पानांनी परमेश्वराची पूजा करावी लागेल

  • त्यात काही भाविकांना हा प्रश्न असतो What we can eat in ekadashi fast? म्हणजेच आपण एकादशीला काय खाऊ शकतो?
    उपवासाच्या दिवसात तांदूळ, गहू पीठ, डाळी, धान्य, कांदा, लसूण वगैरे खात नाहीत. त्याऐवजी फळे, साबुदाणा, मखाना, दूध आणि शिंगाडा किंवा भोपळा किंवा राजगीरा यांच्या पिठापासून बनविलेले पदार्थ सेवन केला जातो.

  • Why rice is not eaten on Ekadashi? म्हणजेच भात एकादशीला का ग्रहण केला जात नाही? 
    याचे शास्त्रीय कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर उच्च आणि निम्न समुद्राची भरती येते. हे जलकुंभ त्या दिशेने आकर्षित करते ज्यामुळे जास्त भरती होऊ शकते. आणि असे म्हणतात की एकादशी तिथीवर चंद्राची स्थिती मानवी पचनसंस्थेला प्रतिकूल आहे.तथापि, लोक या दिवशी तांदूळ टाळण्याचे एक कारण आहे.

  • आपण एकादशीला दूध पिऊ शकतो का? म्हणजेच Can we drink milk on Ekadashi?
    देवोत्थान एकादशीच्या उपवासात फळ व दूध ग्रहण करण्याची परवानगी आहे. कांदा, लसूण, मीठ, नॉन-व्हेज आणि धान्यापासून व्रत न ठेवणारेसुद्धा. ... या एकादशीला आणि वर्षाच्या सर्व एकादशीला तांदूळ न खाण्याचा विधी आहे. तसेच एकादशीला काकडी. मुळा गाजर खाऊ शकतात.

  • हा सुध्दा एक कॉमन प्रश्न आहे Can we drink tea in ekadashi fast? म्हणजेच आम्ही एकादशीत चहा पिऊ शकतो काय?
    उपवास ठेवताना ते कॉफी, चहा, फळे, शेंगदाणे, न शिजवलेले पदार्थ इ. घेण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात की ते खाणे ठीक आहे आणि फक्त तांदळाच्या गोष्टी टाळा. हे स्पष्टपणे आहे उपवासात साखर निषिद्ध आहे. कोणताही खाद्यपदार्थ खडीसाखरेनेयुक्त असावा.

  • उपवासात काही भाविक आपण एकादशीत जलद टोमॅटो खाऊ शकतो का? म्हणजेच Can we eat tomato in ekadashi fast? विचारतात.
    भारतात या दिवशी उपवास करणारे बहुतेक लोक टोमॅटो, फुलकोबी, वांगी, भेंडी आणि पालेभाज्या अशा भाजीपाल्यापासून दूर राहतात आणि मिरपूड, खडक मीठ आणि जिरे वगळता कोणतेही मसाले वापरत नाहीत हळद सुद्धा.

  • आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी एकादशीचे व्रत कधी सोडू शकतो? याचा अर्थ When can I break Ekadashi fast?
    फुले, पाणी आणि भोग (कोणतीही गोड पदार्थ) किंवा फळे अर्पण करा. आरती करुन पूजेचा समारोप करा. दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूची प्रार्थना केल्यावर द्वादशी तिथीला व्रत सोडावा.

  • जसे आपण एकादशीच्या उपवासात झोपू शकतो का? म्हणजेच Can we sleep during Ekadashi fasting?
    झोपण्यास मनाई आहे कारण त्याचा मानवी प्रणालीवर विपरित परिणाम होतो.लोकांच्या समजानुसार एकादशीस उपवास ठेवून चंद्राचा प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक प्रभावाचा प्रतिकार केला जाऊ शकतो. उपवास मनाला चांगली ध्यान करण्याची क्षमता मिळविण्यात मदत करते

  • आधुनिकतेमुळे नवीन काळाचा प्रश्न उपवास दरम्यान चॉकलेट खाऊ शकतो? याचा अर्थ Can chocolate be eaten during fast?
    कोणतेही शिजविलेले अन्न खाण्यास वर्जित आहे आणि फक्त फळ आणि दुध घेण्याची मान्यता आहे. आता लोक भात, चपाती आणि कढीपत्ता, सांभर इत्यादींचा त्याग करून एकादशीला उपवास ठेवतात पण फळ, उपवासाच्या भाज्या, दूध किंवा चहा किंवा कॉफी घेतात.

  • शक्यतो एकादशीच्या वेळी आपण कॉफी पिऊ शकतो का? म्हणजेच Can we drink coffee during Ekadashi fast?
    उपवासादरम्यान आपले शरीर डिटॉक्सिफिकेशन मोडवर जाते, म्हणूनच, त्या काळात प्रक्रिया केलेले, शर्करायुक्त पेय टाळण्याचा सल्ला दिला जातो. उपवासाच्या वेळी आपण कोणत्याही प्रकारचे घन पदार्थ टाळले असेल तर कॉफी आणि चहामुळे आपल्या आरोग्यास अस्वस्थता येते.

 

आपणास एकादशी आणि त्याचे माहात्म्य कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवावे. आपले विचार आणि कमेंट्स आमचे प्रेरणास्थान आहे.

 

!! ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !!

No comments

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.